६२. सहजीवन
काही दु:खं तुझी होती
काही होती माझी
संकटातही केली सोबत
आणि घेतली काळजी
कधी अपयश तुला आलं
कधी आलं मला
तरी दोष दिला नाही
आपण एकमेकाला
काही चुका तू केल्यास
काही केल्या मी
चुकत माकत जपली आपण
आयुष्याची उर्मी
--- लबाड बोका
काही दु:खं तुझी होती
काही होती माझी
संकटातही केली सोबत
आणि घेतली काळजी
कधी अपयश तुला आलं
कधी आलं मला
तरी दोष दिला नाही
आपण एकमेकाला
काही चुका तू केल्यास
काही केल्या मी
चुकत माकत जपली आपण
आयुष्याची उर्मी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा