६३. वसा
करतात सहन निमूटपणे
काढत नाहीत शब्द चकार
अशा दुबळ्यांचा वाली मी
तोच माझा खरा आकार
सोडून दिलाय धोपट मार्ग
केलाय सत्याचा स्विकार
प्रबोधनाचा वसा माझा
काव्यातून करतो साकार
कितीही करा उपेक्षा माझी
कितीही करा तिरस्कार
मिळवणार आहे मी तरीही
जनमताचा पुरस्कार
उतणार नाही मातणार नाही
करणार नाही कधी अपकार
केले आहेत माझ्यावरती
सरस्वतीनेच संस्कार
--- लबाड बोका
करतात सहन निमूटपणे
काढत नाहीत शब्द चकार
अशा दुबळ्यांचा वाली मी
तोच माझा खरा आकार
सोडून दिलाय धोपट मार्ग
केलाय सत्याचा स्विकार
प्रबोधनाचा वसा माझा
काव्यातून करतो साकार
कितीही करा उपेक्षा माझी
कितीही करा तिरस्कार
मिळवणार आहे मी तरीही
जनमताचा पुरस्कार
उतणार नाही मातणार नाही
करणार नाही कधी अपकार
केले आहेत माझ्यावरती
सरस्वतीनेच संस्कार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा