७०. असहाय्य
पडतोय रोज कानावरती
आक्रोश असहाय्य अबलांचा
करतात धावा मदतीसाठी
माझ्यासारख्या कैवाऱ्यांचा
केली होती मदत एकदा
कौरवसभेत आक्रोश ऐकून
ह्यानाही वाटतं बिच्चारींना
देव येईल मदतीला धावून
कुणी एक असेल तर ना मी
द्रौपदीची लाज राखणार
झालेत सगळेच दुर्य़ोधन
कुठे कुठे मी पुरा पडणार
--- लबाड बोका
पडतोय रोज कानावरती
आक्रोश असहाय्य अबलांचा
करतात धावा मदतीसाठी
माझ्यासारख्या कैवाऱ्यांचा
केली होती मदत एकदा
कौरवसभेत आक्रोश ऐकून
ह्यानाही वाटतं बिच्चारींना
देव येईल मदतीला धावून
कुणी एक असेल तर ना मी
द्रौपदीची लाज राखणार
झालेत सगळेच दुर्य़ोधन
कुठे कुठे मी पुरा पडणार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा