७१. घुसमट
वाटतं मला मनातून
मारावीशी मजा
पण संस्कारांचं काय करू
खातात माझा भेजा
दडपून टाकाव्या लागतात
इच्छा मनातल्या मनात
पण निसर्ग ऐकेल कसा
पेटवतो आग तनात
झालीत लग्नं त्यांची
करतात संसार सुखाचा
करत नाहीत विचार
कुणीच माझ्या मनाचा
घुसमट होतेय माझी
झालीय मनस्थिती द्विधा
कळत नाहीय काय करावं
झालाय सगळा वांधा
--- लबाड बोका
वाटतं मला मनातून
मारावीशी मजा
पण संस्कारांचं काय करू
खातात माझा भेजा
दडपून टाकाव्या लागतात
इच्छा मनातल्या मनात
पण निसर्ग ऐकेल कसा
पेटवतो आग तनात
झालीत लग्नं त्यांची
करतात संसार सुखाचा
करत नाहीत विचार
कुणीच माझ्या मनाचा
घुसमट होतेय माझी
झालीय मनस्थिती द्विधा
कळत नाहीय काय करावं
झालाय सगळा वांधा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा