शुक्रवार, २३ मार्च, २०१२

७४. देवास विनंती

                      ७४. देवास विनंती

देवा,
तुझंच नाव सांगून
धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली
राजरोस होतोय छळ आणि अपमान स्त्रियांचा
ह्या कर्मठ आणि अनिष्ठ रुढीवादी लोकांकडून

मासिक पाळीच्या काळात
तिला ठरवलं जातंय अस्पृश्य

मूल न झाल्यास
तिला हिणवलं जातंय वांझ म्हणून

विधवा झाल्यास
तिला ठरवलं जातंय अपशकूनी

आणि बलात्कार झाल्यास
तिलाच ठरवलं जातंय पतिता

तिची काहीच चूक नसताना

देवा,
तू जर खराच असशील अस्तित्वात
आणि माणसाचा पूनर्जन्म होतो हे ही असेल खरं
तर माझी मनापासून एकच विनंती आहे तुला

ह्या सर्व कर्मठ पुरुषांना
दे पूनर्जन्म
आणि घाल स्त्रीच्याच जन्माला
एखाद्या सनातनी, कर्मठ, अनिष्ठ रुढीवादी तथाकथित संस्कृती रक्षकाच्याच घरात

आणि हो देवा,
पुढच्या जन्मात पण त्यांना त्यांचा मागचा जन्म आठवला पाहिजे बरं का.

---  लबाड बोका
   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: