७६. मायावी राक्षस
कधी करतात थयथयाट
कधी काढतात गळे
भरत आली यांची
आता घटका पळे
कधी करतात आक्रोश
कधी देतात शिव्याशाप
जाणार नरकात घेऊन
यांना यांचंच पाप
नाही स्वत:ची अक्कल
देतात ऋषीमुनींचे दाखले
आहे म्हणतात अमृत
कधी कुणी का चाखले
धर्माची भीती घालून
पसरवतात हे अज्ञान
विज्ञानाचा उपभोग घेऊन
मिथ्य म्हणतात विज्ञान
बघतो आहे वरून
देव सर्व काही
प्रत्यक्ष देवाचीही
भीती यांना नाही
जसे मायावी राक्षस
रूप पालटून छळत
ह्यांच्या रूपाने जणू
तेच आलेत परत
--- लबाड बोका
कधी करतात थयथयाट
कधी काढतात गळे
भरत आली यांची
आता घटका पळे
कधी करतात आक्रोश
कधी देतात शिव्याशाप
जाणार नरकात घेऊन
यांना यांचंच पाप
नाही स्वत:ची अक्कल
देतात ऋषीमुनींचे दाखले
आहे म्हणतात अमृत
कधी कुणी का चाखले
धर्माची भीती घालून
पसरवतात हे अज्ञान
विज्ञानाचा उपभोग घेऊन
मिथ्य म्हणतात विज्ञान
बघतो आहे वरून
देव सर्व काही
प्रत्यक्ष देवाचीही
भीती यांना नाही
जसे मायावी राक्षस
रूप पालटून छळत
ह्यांच्या रूपाने जणू
तेच आलेत परत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा