७९. सद्यस्थिती
कधी पडतो दुष्काळ
कधी येतो महापूर
रडतात मग वाचलेले
बडवून आपला उर
कधी होतो धरणीकंप
कधी येतो वादळवारा
पाचोळ्यागत उडून जातो
फाटकाच संसार सारा
कधी होतात दंगली
कधी होतात स्फोट
असेच गिळतो आम्ही
दु:खाचेच तर घोट
कधी फाटतं आभाळ
कधी फुटतं नशिब
साधीसुधी माणसं आम्ही
नेहमी मरतो अशीच
--- लबाड बोका
कधी पडतो दुष्काळ
कधी येतो महापूर
रडतात मग वाचलेले
बडवून आपला उर
कधी होतो धरणीकंप
कधी येतो वादळवारा
पाचोळ्यागत उडून जातो
फाटकाच संसार सारा
कधी होतात दंगली
कधी होतात स्फोट
असेच गिळतो आम्ही
दु:खाचेच तर घोट
कधी फाटतं आभाळ
कधी फुटतं नशिब
साधीसुधी माणसं आम्ही
नेहमी मरतो अशीच
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा