८२. रणशिंग
जिथे जिथे दिसेल दंभ
तिथे तिथे करीन प्रहार
देव जरी असेल सामील
तरी मानणार नाही हार
बांधिलकी माझी सत्याशी
नाही कोणाचा मिंधा होणार
असो कोणी कितीही बलाढ्य
नाही कोणाला शरण जाणार
घालीन घाव घणघणाती
गरजेस मी होईन लोहार
वाचावीर नाही मी
दांभिकांचा करीन संहार
--- लबाड बोका
जिथे जिथे दिसेल दंभ
तिथे तिथे करीन प्रहार
देव जरी असेल सामील
तरी मानणार नाही हार
बांधिलकी माझी सत्याशी
नाही कोणाचा मिंधा होणार
असो कोणी कितीही बलाढ्य
नाही कोणाला शरण जाणार
घालीन घाव घणघणाती
गरजेस मी होईन लोहार
वाचावीर नाही मी
दांभिकांचा करीन संहार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा