८४. उपदेश देवाचा
करू नकोस कर्मकांड
अनिष्टांचा कर त्याग
तुला जाग आणण्यासाठी
सूर्याला मी लावलीय आग
जाळू नकोस अन्नधान्य
नको करूस यज्ञयाग
मागत नाही कधीच मी
कोणाकडेच हविर्भाग
नको माजवू स्तोम कुणाचे
नको लावू संस्कृतीला डाग
जन्म घेतलास माणसाचा तर
माणसासारखंच वाग
--- लबाड बोका
करू नकोस कर्मकांड
अनिष्टांचा कर त्याग
तुला जाग आणण्यासाठी
सूर्याला मी लावलीय आग
जाळू नकोस अन्नधान्य
नको करूस यज्ञयाग
मागत नाही कधीच मी
कोणाकडेच हविर्भाग
नको माजवू स्तोम कुणाचे
नको लावू संस्कृतीला डाग
जन्म घेतलास माणसाचा तर
माणसासारखंच वाग
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा