१०१. सत्वपरीक्षा
पसरत नाही हात कोणापुढे
गरीबीतही जपतो मान
कोणी लालूच दिली तरी
विकत नाही माझं इमान
करतो मेहनत रात्रंदिवस
तेव्हा मिळतात पैसे चार
इज्जतीने खातो भाकर
तिला असते लज्जत फार
रहावं लागतं कधी उपाशी
तेव्हा सोसतो थोडी कळ
परीक्षा माझी पहाण्यासाठी
देवही करतो माझा छळ
--- लबाड बोका
पसरत नाही हात कोणापुढे
गरीबीतही जपतो मान
कोणी लालूच दिली तरी
विकत नाही माझं इमान
करतो मेहनत रात्रंदिवस
तेव्हा मिळतात पैसे चार
इज्जतीने खातो भाकर
तिला असते लज्जत फार
रहावं लागतं कधी उपाशी
तेव्हा सोसतो थोडी कळ
परीक्षा माझी पहाण्यासाठी
देवही करतो माझा छळ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा