१०२. एकाकी
उरलोत आम्ही दोघंच
गेले पक्षी उडून
बांधले होते घरटे
काडी काडी जोडून
आयुष्य असे एकाकी
ती ही झाली मोनी
लोटला कितीक काळ
फिरकलेच नाही कोणी
ठेवलीत सताड उघडी
खिडक्या आणि दारे
चोरी करण्यासाठी तरी
इथे कुणीतरी या रे
--- लबाड बोका
उरलोत आम्ही दोघंच
गेले पक्षी उडून
बांधले होते घरटे
काडी काडी जोडून
आयुष्य असे एकाकी
ती ही झाली मोनी
लोटला कितीक काळ
फिरकलेच नाही कोणी
ठेवलीत सताड उघडी
खिडक्या आणि दारे
चोरी करण्यासाठी तरी
इथे कुणीतरी या रे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा