१०३.रुजूवात
कधी संपणार दैन्य
कधी संपणार भोग
कधी येणार नशिबात
श्रीमंतीचा योग
किती धडपड करणार
खचत चाललाय धीर
कधी भेदणार लक्ष्य
वायाच चाललेत तीर
नाहीच जमणार मुळी
आता मागे फिरून
पाहिलेली सारी स्वप्नं
जातील मग विरून
करूया नवे प्रयत्न
करूया नवी सुरूवात
यशाची आणि प्रयत्नांची
घालूया पुन्हा रुजूवात
--- लबाड बोका
कधी संपणार दैन्य
कधी संपणार भोग
कधी येणार नशिबात
श्रीमंतीचा योग
किती धडपड करणार
खचत चाललाय धीर
कधी भेदणार लक्ष्य
वायाच चाललेत तीर
नाहीच जमणार मुळी
आता मागे फिरून
पाहिलेली सारी स्वप्नं
जातील मग विरून
करूया नवे प्रयत्न
करूया नवी सुरूवात
यशाची आणि प्रयत्नांची
घालूया पुन्हा रुजूवात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा