८६. अपूर्ण
समांतराच्या समांतरातले
आदिम व्याकूळ दोन काठ
ऋणानुबंधाच्या बंधाची
पडत नाही अजून गाठ
दोन ध्रुवांचे तोडून बंधन
लाटांमागून येते लाट
ढासळणार कधी पण आणि
चिरेबंदी तो प्राचीन घाट
परिघावरती अजून गाडगे
आसुसून परि फिरे रहाट
थकला जीव थकली गात्रे
तिन्हीसांजेलाच झाली पहाट
--- लबाड बोका
समांतराच्या समांतरातले
आदिम व्याकूळ दोन काठ
ऋणानुबंधाच्या बंधाची
पडत नाही अजून गाठ
दोन ध्रुवांचे तोडून बंधन
लाटांमागून येते लाट
ढासळणार कधी पण आणि
चिरेबंदी तो प्राचीन घाट
परिघावरती अजून गाडगे
आसुसून परि फिरे रहाट
थकला जीव थकली गात्रे
तिन्हीसांजेलाच झाली पहाट
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा