८७. क्रांती
राम जाणून राम होईन
कृष्ण कोळून होईन कृष्ण
माझ्याही धमन्यांत आहे
शिवरायांचंच रक्त उष्ण
आस मला ही स्वतंत्रतेची
गिरवीन मी त्यांचाच कित्ता
माझ्यासाठीच सांगितली आहे
श्रीकृष्णाने भगवद्गीता
आण घालता शिवरायांची
पेटेल वणवा या प्रांती
उत्थानास्तव महाराष्ट्राच्या
करणारच आहे मी क्रांती
--- लबाड बोका
राम जाणून राम होईन
कृष्ण कोळून होईन कृष्ण
माझ्याही धमन्यांत आहे
शिवरायांचंच रक्त उष्ण
आस मला ही स्वतंत्रतेची
गिरवीन मी त्यांचाच कित्ता
माझ्यासाठीच सांगितली आहे
श्रीकृष्णाने भगवद्गीता
आण घालता शिवरायांची
पेटेल वणवा या प्रांती
उत्थानास्तव महाराष्ट्राच्या
करणारच आहे मी क्रांती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा