८८. आम्ही देवभक्त
आम्ही जाणतो ब्रह्म
आम्हालाच ज्ञान असतं
आहोत आम्ही सर्वज्ञानी
सगळं आम्हाला दिसतं
देतो आम्ही आशिर्वाद
उंचावून आमचा हस्त
आमच्या असल्या ढोंगाला
सगळंच जग फसतं
पहा मोठा आश्रम आमचा
पण भरत नाही दस्त
कर बिर असलं काही
आमच्यासाठी नसतं
अध्यात्माने भरत नाही
पोट करतं त्रस्त
मागतो आम्ही भिक मग
पण भिक्षा म्हणणं रास्त
भरल्यापोटी येते मजा
अध्यात्माची जास्त
पोटावरच आहे खरी
अध्यात्माची भिस्त
लोक देतात जे जे काही
सगळंच करतो फस्त
काबाडकष्ट करत नाही
मजेत जगतो मस्त
हसू नका आम्हाला
व्हाल मग ध्वस्त
शिकवू धडा जन्माचा
खात बसाल खस्त
बडी बडी धेंडं सुद्धा
असतात आमचीच भक्त
देवच करतो लाड आमचे
आणि आम्ही देवाचे भक्त
--- लबाड बोका
आम्ही जाणतो ब्रह्म
आम्हालाच ज्ञान असतं
आहोत आम्ही सर्वज्ञानी
सगळं आम्हाला दिसतं
देतो आम्ही आशिर्वाद
उंचावून आमचा हस्त
आमच्या असल्या ढोंगाला
सगळंच जग फसतं
पहा मोठा आश्रम आमचा
पण भरत नाही दस्त
कर बिर असलं काही
आमच्यासाठी नसतं
अध्यात्माने भरत नाही
पोट करतं त्रस्त
मागतो आम्ही भिक मग
पण भिक्षा म्हणणं रास्त
भरल्यापोटी येते मजा
अध्यात्माची जास्त
पोटावरच आहे खरी
अध्यात्माची भिस्त
लोक देतात जे जे काही
सगळंच करतो फस्त
काबाडकष्ट करत नाही
मजेत जगतो मस्त
हसू नका आम्हाला
व्हाल मग ध्वस्त
शिकवू धडा जन्माचा
खात बसाल खस्त
बडी बडी धेंडं सुद्धा
असतात आमचीच भक्त
देवच करतो लाड आमचे
आणि आम्ही देवाचे भक्त
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा