९०. अटळ
चुकलो होतो वाट
नव्हता कुणाचा वावर
होती वाटेवाटेवर
सोबतीला काटेसावर
तेवढीच खूण ओळखीची
तेवढाच धीर मनाला
होती भीती तरीही
सांगणार तिथे कुणाला
पडलो बाहेर एकदाचा
तेव्हातरी कसाबसा
पण जन्म मृत्यूचा फेरा
तो टाळणार कसा
--- लबाड बोका
चुकलो होतो वाट
नव्हता कुणाचा वावर
होती वाटेवाटेवर
सोबतीला काटेसावर
तेवढीच खूण ओळखीची
तेवढाच धीर मनाला
होती भीती तरीही
सांगणार तिथे कुणाला
पडलो बाहेर एकदाचा
तेव्हातरी कसाबसा
पण जन्म मृत्यूचा फेरा
तो टाळणार कसा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा