९८. त्रागा
असं कसं माझ्यावाचून
कोणाचंच काही अडत नाही
असं कसं माझ्यावरती
कोणाचंच मन जडत नाही
मलाही येतो राग मग
मनात काही दडत नाही
बोलून खूप हलकं वाटतं
मी ही मग रडत नाही
आभाळ केव्हाचं आलंय भरून
पण पाऊस काही पडत नाही
असंच होतं जेव्हा तेव्हा
मनासारखं काही घडत नाही
--- लबाड बोका
असं कसं माझ्यावाचून
कोणाचंच काही अडत नाही
असं कसं माझ्यावरती
कोणाचंच मन जडत नाही
मलाही येतो राग मग
मनात काही दडत नाही
बोलून खूप हलकं वाटतं
मी ही मग रडत नाही
आभाळ केव्हाचं आलंय भरून
पण पाऊस काही पडत नाही
असंच होतं जेव्हा तेव्हा
मनासारखं काही घडत नाही
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा