९९. आई
आठवतंय अजून मला
करायचीस तू माझे लाड
लपायचो मी कधी कधी
तुझ्याच तर पदराआड
मारायचीस तू कधी मला
करायचो मी जेव्हा खोड्या
तरीही घ्यायचीस कुशीत मला
आहेत तशा आठवणी थोड्या
एवढा मोठा झालो तरी
अजून तुझी गरज वाटते
आणि तुझ्या आठवणींनी
मन माझे अजून दाटते
नाहीस गं तू आई आता
आणि नाही गं ते बालपण
एकटाच रडत बसतो मी
काढून तुझी आठवण
--- लबाड बोका
आठवतंय अजून मला
करायचीस तू माझे लाड
लपायचो मी कधी कधी
तुझ्याच तर पदराआड
मारायचीस तू कधी मला
करायचो मी जेव्हा खोड्या
तरीही घ्यायचीस कुशीत मला
आहेत तशा आठवणी थोड्या
एवढा मोठा झालो तरी
अजून तुझी गरज वाटते
आणि तुझ्या आठवणींनी
मन माझे अजून दाटते
नाहीस गं तू आई आता
आणि नाही गं ते बालपण
एकटाच रडत बसतो मी
काढून तुझी आठवण
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा