१०४. आईची सावली
लहान असतो आपण तेव्हा
खेळ खेळतो बाहुलीचा
विचार सुद्धा येत नाही
कधी मनात पावलीचा
चिंतामुक्त जगणं असतं
धोका नसतो काहिलीचा
आईसारखं दैवत नाही
धडा असतो पहिलीचा
कधी काही झालं तरी
आधार असतो माऊलीचा
असाच मिळू दे सगळ्यांना
एक ढग सावलीचा
--- लबाड बोका
लहान असतो आपण तेव्हा
खेळ खेळतो बाहुलीचा
विचार सुद्धा येत नाही
कधी मनात पावलीचा
चिंतामुक्त जगणं असतं
धोका नसतो काहिलीचा
आईसारखं दैवत नाही
धडा असतो पहिलीचा
कधी काही झालं तरी
आधार असतो माऊलीचा
असाच मिळू दे सगळ्यांना
एक ढग सावलीचा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा