१०६. भग्न किल्ले
असेल संबंध पूर्वजन्मीचा
किल्ल्यांवर मी होतो मग्न
कधी काळी गजबजलेले
किल्ले आज झालेत भग्न
जागेचंही असतं भाग्य
राहिली भोकं नी गेले काप
भव्य दिव्य इतिहासाची
उरलीय केविलवाणी छाप
वाईट खूप वाटतं मला
किल्ल्यांची अशी अवस्था पाहून
कसे बांधले असतील त्यांनी
आश्चर्य वाटतं राहून राहून
किल्ले होते गरज काळाची
राहिला नाही तो काळ
तरीसुद्धा आहे अजून
खोल कुठेतरी रुतून पाळ
--- लबाड बोका
असेल संबंध पूर्वजन्मीचा
किल्ल्यांवर मी होतो मग्न
कधी काळी गजबजलेले
किल्ले आज झालेत भग्न
जागेचंही असतं भाग्य
राहिली भोकं नी गेले काप
भव्य दिव्य इतिहासाची
उरलीय केविलवाणी छाप
वाईट खूप वाटतं मला
किल्ल्यांची अशी अवस्था पाहून
कसे बांधले असतील त्यांनी
आश्चर्य वाटतं राहून राहून
किल्ले होते गरज काळाची
राहिला नाही तो काळ
तरीसुद्धा आहे अजून
खोल कुठेतरी रुतून पाळ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा