११०. आश्वासन
करू नका विरोध मला
माहित नाही काय करीन
शंकर देखील करणार नाही
असं तांडव मी करीन
करीन जग उलटं पालटं
आकाश पाताळ एक करीन
समुद्राचं पाणी सगळं
आकाशाच्या पोकळीत भरीन
नुसत्या एका हाताने
ग्रहतारे बाजूला सारीन
सूर्य देखील विझून जाईल
एवढी जोरात फुंकर मारीन
समजू नका मारतोय बढाया
सांगितलेलं खरं करीन
फक्त माझ्या भजनी लागा
तरच तुमचं भलं करीन
--- लबाड बोका
करू नका विरोध मला
माहित नाही काय करीन
शंकर देखील करणार नाही
असं तांडव मी करीन
करीन जग उलटं पालटं
आकाश पाताळ एक करीन
समुद्राचं पाणी सगळं
आकाशाच्या पोकळीत भरीन
नुसत्या एका हाताने
ग्रहतारे बाजूला सारीन
सूर्य देखील विझून जाईल
एवढी जोरात फुंकर मारीन
समजू नका मारतोय बढाया
सांगितलेलं खरं करीन
फक्त माझ्या भजनी लागा
तरच तुमचं भलं करीन
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा