१११. अंधार
अजून नाही वस्त्र निवारा
अजून नाही घोटभर पाणी
अजून तसेच रस्ते कच्चे
अजून तशीच पाऊले अनवाणी
अजून मिळत नाही अन्न
अजून होतंय तसंच कुपोषण
अजूनही केलं जातंय
लहानग्यांचं तसंच शोषण
अजून आहेत अंधश्रद्धा
अजून दिले जातात बळी
अजून खुडली जाते तशीच
गर्भामध्येच निष्पाप कळी
वाट पहातोय प्रकाशाची
अजून अंधार दिशा दाही
लोटली आहेत कित्येक युगं
अजून सूर्य उगवत नाही
--- लबाड बोका
अजून नाही वस्त्र निवारा
अजून नाही घोटभर पाणी
अजून तसेच रस्ते कच्चे
अजून तशीच पाऊले अनवाणी
अजून मिळत नाही अन्न
अजून होतंय तसंच कुपोषण
अजूनही केलं जातंय
लहानग्यांचं तसंच शोषण
अजून आहेत अंधश्रद्धा
अजून दिले जातात बळी
अजून खुडली जाते तशीच
गर्भामध्येच निष्पाप कळी
वाट पहातोय प्रकाशाची
अजून अंधार दिशा दाही
लोटली आहेत कित्येक युगं
अजून सूर्य उगवत नाही
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा