११३. अपरिहार्य
मिळतं काहींना बसल्याजागी
करावं लागत नाही काही
मी करतो प्रयत्न तरी
मलाच कसं मिळत नाही
कसं मानू नको नशिब
कसं मानू नको दैव
सृष्टीच्या पसाऱ्यातला
मी तर एक साधा जैव
होतो मी असहाय हतबल
येतं मग मला नैराश्य
मरण्याचीही वाटते भीती
जगत रहातो तसंच आयुष्य
--- लबाड बोका
मिळतं काहींना बसल्याजागी
करावं लागत नाही काही
मी करतो प्रयत्न तरी
मलाच कसं मिळत नाही
कसं मानू नको नशिब
कसं मानू नको दैव
सृष्टीच्या पसाऱ्यातला
मी तर एक साधा जैव
होतो मी असहाय हतबल
येतं मग मला नैराश्य
मरण्याचीही वाटते भीती
जगत रहातो तसंच आयुष्य
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा