११४. अनाथ
नव्हतेच कोड कवतुक
नव्हता कुणाचा आधार
नव्हतीच माया ममता
नव्हतेच मला घरदार
गेले सोडून आईबाप
होतो मी जेव्हा छोटा
जळून गेले बाल्य
असाच झालो मोठा
साहिली किती अवहेलना
साहिले किती वाग्बाण
काय होता गुन्हा माझा
साहिला तरी अपमान
जगलोच नाही कधी मी
सुखाने क्षणभर निवांत
नाही आले मरण म्हणून
आहे अजूनही मी जिवंत
--- लबाड बोका
नव्हतेच कोड कवतुक
नव्हता कुणाचा आधार
नव्हतीच माया ममता
नव्हतेच मला घरदार
गेले सोडून आईबाप
होतो मी जेव्हा छोटा
जळून गेले बाल्य
असाच झालो मोठा
साहिली किती अवहेलना
साहिले किती वाग्बाण
काय होता गुन्हा माझा
साहिला तरी अपमान
जगलोच नाही कधी मी
सुखाने क्षणभर निवांत
नाही आले मरण म्हणून
आहे अजूनही मी जिवंत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा