१२४. आवई
वागतो आम्ही विसंगत
पण बोलू नकाच काही
चूक आमची दाखवलेली
आम्हाला आवडत नाही
वागू आम्ही कसेही
पण देऊ नका दखल
शहाणेच आम्ही जन्मजात
अन् तुम्हाला नाही अक्कल
कराल टिका आमच्यावर
तर करू लगेच घाई
देव धर्म सकटात
उठवू आम्ही आवई
--- लबाड बोका
वागतो आम्ही विसंगत
पण बोलू नकाच काही
चूक आमची दाखवलेली
आम्हाला आवडत नाही
वागू आम्ही कसेही
पण देऊ नका दखल
शहाणेच आम्ही जन्मजात
अन् तुम्हाला नाही अक्कल
कराल टिका आमच्यावर
तर करू लगेच घाई
देव धर्म सकटात
उठवू आम्ही आवई
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा