१२५. यार
सकाळपासून पावसाची
चालू आहे संततधार
पागोळ्यांच्या आवाजांनी
अजूनच वाटतंय गार
कुंद पावसाळी हवा
मस्तच लागलीय तार
उघडाच मी भिजतो आहे
वेडाच झालोय पार
सांगाती माझा जन्माचा
आवडतो तो फार
वर्षभराने आला आहे
भेटायला माझा यार
--- लबाड बोका
सकाळपासून पावसाची
चालू आहे संततधार
पागोळ्यांच्या आवाजांनी
अजूनच वाटतंय गार
कुंद पावसाळी हवा
मस्तच लागलीय तार
उघडाच मी भिजतो आहे
वेडाच झालोय पार
सांगाती माझा जन्माचा
आवडतो तो फार
वर्षभराने आला आहे
भेटायला माझा यार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा