१२८. आत्मभान
करूया एखादी छानशी कविता
असं म्हणून मी बसतो लिहायला
काहीच सुचत नाही तेव्हा
चेहरा माझा हवा पहायला
होतो मग मी अस्वस्थ थोडा
वाटतं मला एकदम रितेपण
संपली वाटतं सृजनशीलता
मनात येतात विचार काहीपण
अजूनच मग वाटतं उदास
नजरही मग जाते शून्यात
नाहीतरी होतेच कुठे
गणना माझी शहाण्यात
--- लबाड बोका
करूया एखादी छानशी कविता
असं म्हणून मी बसतो लिहायला
काहीच सुचत नाही तेव्हा
चेहरा माझा हवा पहायला
होतो मग मी अस्वस्थ थोडा
वाटतं मला एकदम रितेपण
संपली वाटतं सृजनशीलता
मनात येतात विचार काहीपण
अजूनच मग वाटतं उदास
नजरही मग जाते शून्यात
नाहीतरी होतेच कुठे
गणना माझी शहाण्यात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा