१२७. जन्म झाडाचा
ऊन पाऊस वादळ वारा
उघड्यावरच असतात बिचारी
कसं काय सहन करतात
कोणीच ना त्यांना विचारी
होत नसतील का त्यांना वेदना
होत नसेल का त्यांना दुख्ख
वाटत नसेल का त्यांना कधी
आपलाही असावा सुखावर हक्क
आपल्यालाही मिळावी सावली
धरावी कोणीतरी आपल्यावरही छत्री
वाटत नसेल का बिचाऱ्यांना
भीती भयाण काळोख्या रात्री
कसला जन्म झाडाचा हा
असला कसला विचित्र योग
बोलताही येत नाही त्यांना
कोणत्या कर्माचे भोगतात भोग
--- लबाड बोका
ऊन पाऊस वादळ वारा
उघड्यावरच असतात बिचारी
कसं काय सहन करतात
कोणीच ना त्यांना विचारी
होत नसतील का त्यांना वेदना
होत नसेल का त्यांना दुख्ख
वाटत नसेल का त्यांना कधी
आपलाही असावा सुखावर हक्क
आपल्यालाही मिळावी सावली
धरावी कोणीतरी आपल्यावरही छत्री
वाटत नसेल का बिचाऱ्यांना
भीती भयाण काळोख्या रात्री
कसला जन्म झाडाचा हा
असला कसला विचित्र योग
बोलताही येत नाही त्यांना
कोणत्या कर्माचे भोगतात भोग
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा