१२९. नशिबवंत
कोणी असतं जन्मजात तर
कोणी होतं अपघातात अपंग
इतक्या शक्यता असूनही
मी मात्र आहे अव्यंग
कोणी होतात वेडसर पुरे
कोणी असतात मतिमंद
इतके राहिलेत अडाणी बिचारे
पण मी झालोय बुद्धिवंत
मिळालंय एवढं नशिबाने
आणखी कसली करू खंत
कशास करू माज आणिक
कशास धरू कोणावर दंत
काहीच कर्तृत्व नाही माझे
आहे केवळ मी नशिबवंत
मरतात माणसं हजारो कारणांनी
पण मी आहे अजून जिवंत
--- लबाड बोका
कोणी असतं जन्मजात तर
कोणी होतं अपघातात अपंग
इतक्या शक्यता असूनही
मी मात्र आहे अव्यंग
कोणी होतात वेडसर पुरे
कोणी असतात मतिमंद
इतके राहिलेत अडाणी बिचारे
पण मी झालोय बुद्धिवंत
मिळालंय एवढं नशिबाने
आणखी कसली करू खंत
कशास करू माज आणिक
कशास धरू कोणावर दंत
काहीच कर्तृत्व नाही माझे
आहे केवळ मी नशिबवंत
मरतात माणसं हजारो कारणांनी
पण मी आहे अजून जिवंत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा