११९. उमेद
करत नाही काही कष्ट
तरी दुखतात पाय हात
रोज घासतो नेमाने तरी
किडत चालले आहेत दात
चाकरी करतो इमाने इतबारे
वापरत नाही जराही अक्कल
एवढी काळजी घेतो तरी
पडत चालले आहे टक्कल
दिसतो आता कसातरी मी
माझीच मला वाटते शरम
तब्येतही असते माझी
थोडी थोडी नरम गरम
काय होणार आहे माझं
वाटते मला सारखी भीती
नसते रोग लागलेत पाठी
गोळ्या तरी घेऊ किती
दिसत नाही नीट आता
नजरही झालीय अधू
इतकं सारं असूनही
हवीय मला तरुण वधू
--- लबाड बोका
करत नाही काही कष्ट
तरी दुखतात पाय हात
रोज घासतो नेमाने तरी
किडत चालले आहेत दात
चाकरी करतो इमाने इतबारे
वापरत नाही जराही अक्कल
एवढी काळजी घेतो तरी
पडत चालले आहे टक्कल
दिसतो आता कसातरी मी
माझीच मला वाटते शरम
तब्येतही असते माझी
थोडी थोडी नरम गरम
काय होणार आहे माझं
वाटते मला सारखी भीती
नसते रोग लागलेत पाठी
गोळ्या तरी घेऊ किती
दिसत नाही नीट आता
नजरही झालीय अधू
इतकं सारं असूनही
हवीय मला तरुण वधू
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा