१२०. हतवीर्य
जेव्हा जेव्हा करतो मी
ब्रह्मचर्याचा आचार
तेव्हाच नेमका येतो मनात
हटकून तुझा विचार
सांगत असतो लोकांना मी
ब्रह्मचर्य म्हणजेच जीवन
पण तुझ्यावाचून जाणवतंय
माझंच मला रितेपण
जाणवतो सगळा फोलपणा
जाणवतं सगळं सत्य
तुझ्यावाचून नाही मुळी
माझ्या जीवनात तथ्य
कसली आलीय विरक्ती नी
कसलं आलंय ब्रह्मचर्य
असा कसा मी होतो नेहमी
तुझ्यापुढे हतवीर्य
--- लबाड बोका
जेव्हा जेव्हा करतो मी
ब्रह्मचर्याचा आचार
तेव्हाच नेमका येतो मनात
हटकून तुझा विचार
सांगत असतो लोकांना मी
ब्रह्मचर्य म्हणजेच जीवन
पण तुझ्यावाचून जाणवतंय
माझंच मला रितेपण
जाणवतो सगळा फोलपणा
जाणवतं सगळं सत्य
तुझ्यावाचून नाही मुळी
माझ्या जीवनात तथ्य
कसली आलीय विरक्ती नी
कसलं आलंय ब्रह्मचर्य
असा कसा मी होतो नेहमी
तुझ्यापुढे हतवीर्य
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा