१३१. नैराश्य
असं कसं नशिब माझं
वाटतं मला कुतुहल
अपमान आणि उपेक्षेचं
पचवतो रोज हलाहल
करतो प्रयत्न जीव तोडून
पण नशिबाची नाही साथ
मदतीची तर बातच सोडा
खात असतो रोजच लाथ
असंच संपणार वाटतं आयुष्य
असेच होणार वाटतं हाल
आजचा दिवस पाहून वाटतं
बरा तरी होता काल
उबग आलाय जगण्याचाच
आलंय खूप नैराश्य
कधी कधी वाटतं सालं
संपवून टाकावं आयुष्य
--- लबाड बोका
असं कसं नशिब माझं
वाटतं मला कुतुहल
अपमान आणि उपेक्षेचं
पचवतो रोज हलाहल
करतो प्रयत्न जीव तोडून
पण नशिबाची नाही साथ
मदतीची तर बातच सोडा
खात असतो रोजच लाथ
असंच संपणार वाटतं आयुष्य
असेच होणार वाटतं हाल
आजचा दिवस पाहून वाटतं
बरा तरी होता काल
उबग आलाय जगण्याचाच
आलंय खूप नैराश्य
कधी कधी वाटतं सालं
संपवून टाकावं आयुष्य
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा