१३२. नशिब
जन्माला जेव्हा येतो आपण
काहीच नसतं आपल्या हातात
जवळची सगळी नाती सोडाच
माहितही नसतो धर्म आणि जात
जे मिळेल ते घ्यावं लागतं
पर्यायच नसतो दुसरा काही
तेच घेऊन जगावं लागतं
मान मरातब किंवा अवहेलनाही
ह्यालाच म्हणतात नशिब लोक
ज्याचं त्यालाच भोगावं लागतं
घडेपर्यंत कळत नाही
नशिबात आपल्या काय असतं
म्हणूनच मन शांत ठेवा
अपयशाने खचू नका
मिळालंच यश नशिबाने तर
मुळीच हुरळून जाऊ नका
--- लबाड बोका
जन्माला जेव्हा येतो आपण
काहीच नसतं आपल्या हातात
जवळची सगळी नाती सोडाच
माहितही नसतो धर्म आणि जात
जे मिळेल ते घ्यावं लागतं
पर्यायच नसतो दुसरा काही
तेच घेऊन जगावं लागतं
मान मरातब किंवा अवहेलनाही
ह्यालाच म्हणतात नशिब लोक
ज्याचं त्यालाच भोगावं लागतं
घडेपर्यंत कळत नाही
नशिबात आपल्या काय असतं
म्हणूनच मन शांत ठेवा
अपयशाने खचू नका
मिळालंच यश नशिबाने तर
मुळीच हुरळून जाऊ नका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा