१३४. नाव
विचारतो आपण दुस-यांना
असतं केवढं कुतुहल
नाव ऐकून दुस-यांचं
बांधतो मनात अटकऴ
बरंच काही असतं नावात
नसतो सगळाच तपशील
पण सोय असतं व्यवहाराची
दूर करतं मुश्कील
वाटत असतं प्रत्येकाला
नाव आपलं अनमोल
तेच असतं ओळख आपली
पण तेच कधी असतं फोल
कोणी करून घेतं खराब
कोणी करतं उज्ज्वल नाव
कोणाला नसते किंमत काहीच
तर कोणाचं नावच खातं भाव
कोणी जगतो नावावर तर
कोणी मरतो नावासाठी
कधी कोणाचं नावच ऐकून
कपाळावर पडते आठी
--- लबाड बोका
विचारतो आपण दुस-यांना
असतं केवढं कुतुहल
नाव ऐकून दुस-यांचं
बांधतो मनात अटकऴ
बरंच काही असतं नावात
नसतो सगळाच तपशील
पण सोय असतं व्यवहाराची
दूर करतं मुश्कील
वाटत असतं प्रत्येकाला
नाव आपलं अनमोल
तेच असतं ओळख आपली
पण तेच कधी असतं फोल
कोणी करून घेतं खराब
कोणी करतं उज्ज्वल नाव
कोणाला नसते किंमत काहीच
तर कोणाचं नावच खातं भाव
कोणी जगतो नावावर तर
कोणी मरतो नावासाठी
कधी कोणाचं नावच ऐकून
कपाळावर पडते आठी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा