१३५. स्त्री भ्रूण कत्तल
नसेल जन्मणार मुलगी कोणी
नसेल जन्मणार उद्याची माय
कशी जन्मेल जिजाऊ मग
नी कसे जन्मतील शिवराय
मुलीपेक्षा मुलगा बरा
असली कसली खोटी नीती
मुलगी सुद्धा असतेच की
ईश्वराचीच निर्मिती
आपल्याच रक्तामासाची पोर
मारता तरी कशी जिती
आई बापाच्या नावाला हा
कलंक तरी लावता किती
अशाच मारल्यात मुली तर
दिसतंय उद्याचं चित्र स्पष्ट
तुमच्या अशा करणीमुळे
मानव जातच होईल नष्ट
--- लबाड बोका
नसेल जन्मणार मुलगी कोणी
नसेल जन्मणार उद्याची माय
कशी जन्मेल जिजाऊ मग
नी कसे जन्मतील शिवराय
मुलीपेक्षा मुलगा बरा
असली कसली खोटी नीती
मुलगी सुद्धा असतेच की
ईश्वराचीच निर्मिती
आपल्याच रक्तामासाची पोर
मारता तरी कशी जिती
आई बापाच्या नावाला हा
कलंक तरी लावता किती
अशाच मारल्यात मुली तर
दिसतंय उद्याचं चित्र स्पष्ट
तुमच्या अशा करणीमुळे
मानव जातच होईल नष्ट
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा