१३६. स्फूर्ती
आहेत स्वप्नं माझी काही
दूर दूर क्षितिजा पलिकडे
येत नाहीत दृष्टीपथात अजून
पण नजर मात्र आहे तिकडे
द्यावासा वाटतो सोडून नाद
नाऊमेदही होतो कधी
धावतो तरी त्यांच्यामागे
वेड घेऊन डोक्यामधी
कसा जगू स्वप्नांशिवाय
त्यांच्यामुळेच मिळते स्फूर्ती
तिच मिळवून देतील मला
तिन्ही लोकी दिगंत किर्ती
--- लबाड बोका
आहेत स्वप्नं माझी काही
दूर दूर क्षितिजा पलिकडे
येत नाहीत दृष्टीपथात अजून
पण नजर मात्र आहे तिकडे
द्यावासा वाटतो सोडून नाद
नाऊमेदही होतो कधी
धावतो तरी त्यांच्यामागे
वेड घेऊन डोक्यामधी
कसा जगू स्वप्नांशिवाय
त्यांच्यामुळेच मिळते स्फूर्ती
तिच मिळवून देतील मला
तिन्ही लोकी दिगंत किर्ती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा