१३८. विचार चक्र
एक जातो न जातो तोच
लगेच येतो दुसरा विचार
हेच चालू असतं मनात
झोपतो फक्त घटका चार
विचारांशिवाय जात नाही
एक क्षण जागेपणी
वाटत नाही होईल सुटका
विचारांपासून जिवंतपणी
विचार करून विचारांचा
उबग आता आलाय नुसता
किती बरं होईल जर
विचार आला असता पुसता
तोच विचार करतो आहे
आता देखील उठता बसता
उद्योग नाही मनाला काही
चाळा लागलाय उगाच नसता
--- लबाड बोका
एक जातो न जातो तोच
लगेच येतो दुसरा विचार
हेच चालू असतं मनात
झोपतो फक्त घटका चार
विचारांशिवाय जात नाही
एक क्षण जागेपणी
वाटत नाही होईल सुटका
विचारांपासून जिवंतपणी
विचार करून विचारांचा
उबग आता आलाय नुसता
किती बरं होईल जर
विचार आला असता पुसता
तोच विचार करतो आहे
आता देखील उठता बसता
उद्योग नाही मनाला काही
चाळा लागलाय उगाच नसता
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा