१४२. गमक
लयीत चपखल बसणारं
मिळतं जेव्हा वाक्य
तेव्हाच कविता लिहिणं
होतं मला शक्य
म्हणून काही काहीही
लिहित नाही मी कधी
विषय आणि आशयही
असतो माझ्या कवितेमधी
चालत नाही मुळीच इथे
नुसतं उगाच जुळवून यमक
भिडायला हवी मनालाही
तेच माझ्या कवितेचं गमक
--- लबाड बोका
लयीत चपखल बसणारं
मिळतं जेव्हा वाक्य
तेव्हाच कविता लिहिणं
होतं मला शक्य
म्हणून काही काहीही
लिहित नाही मी कधी
विषय आणि आशयही
असतो माझ्या कवितेमधी
चालत नाही मुळीच इथे
नुसतं उगाच जुळवून यमक
भिडायला हवी मनालाही
तेच माझ्या कवितेचं गमक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा