१४३. जोड
दूर दूर क्षितिजापल्याड
विहरत जाईन होऊन खग
डोळे भरून पाहून घेईन
न पाहिलेलं सुंदर जग
अशीच बघतो सुंदर स्वप्नं
असंच चेतवतो माझं मन
स्वप्नांमध्येच गवसतात मला
जगण्यालायक सुंदर क्षण
स्वप्नंच ठेवून डोळ्यांसमोर
करायचे असतात कठोर यत्न
तेव्हा कुठे हाती लागतात
स्वप्नांमधली सुंदर रत्नं
--- लबाड बोका
दूर दूर क्षितिजापल्याड
विहरत जाईन होऊन खग
डोळे भरून पाहून घेईन
न पाहिलेलं सुंदर जग
अशीच बघतो सुंदर स्वप्नं
असंच चेतवतो माझं मन
स्वप्नांमध्येच गवसतात मला
जगण्यालायक सुंदर क्षण
स्वप्नंच ठेवून डोळ्यांसमोर
करायचे असतात कठोर यत्न
तेव्हा कुठे हाती लागतात
स्वप्नांमधली सुंदर रत्नं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा