१४४. किनारा
पाय रोऊन असला तरी
असतो बिचारा धुपत
समुद्राच्या लाटांनाही
किनारा असतो खुपत
विस्तारणाऱ्या समुद्राच्या
मार्गात असतो काटा
म्हणून मग बिचाऱ्याला
झोडून काढतात लाटा
तडाखे खाऊन लाटांचे
खचतो मग कधीतरी
नवीन किनारा होतो तयार
अजून मागे कुठेतरी
असंच चालू असतं तरी
तो मात्र नसतो भिणारा
थांबेल हे सारं जेव्हा
शेवटचा खचेल किनारा
--- लबाड बोका
पाय रोऊन असला तरी
असतो बिचारा धुपत
समुद्राच्या लाटांनाही
किनारा असतो खुपत
विस्तारणाऱ्या समुद्राच्या
मार्गात असतो काटा
म्हणून मग बिचाऱ्याला
झोडून काढतात लाटा
तडाखे खाऊन लाटांचे
खचतो मग कधीतरी
नवीन किनारा होतो तयार
अजून मागे कुठेतरी
असंच चालू असतं तरी
तो मात्र नसतो भिणारा
थांबेल हे सारं जेव्हा
शेवटचा खचेल किनारा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा