१५८. दैन्य
अन्नाविन खपाटीला
गेलेले पोट मी
घोटभर पाण्याविन
सुकलेले ओठ मी
परिस्थितीच्या रेट्यापुढे
घसरलेला पाय मी
कोणापुढे लाचारीने
पसरलेला हात मी
जिवंतांच्या जगातले
आहे एक शून्य मी
नशिबाच्या भोगातले
मूर्तिमंत दैन्य मी
--- लबाड बोका
अन्नाविन खपाटीला
गेलेले पोट मी
घोटभर पाण्याविन
सुकलेले ओठ मी
परिस्थितीच्या रेट्यापुढे
घसरलेला पाय मी
कोणापुढे लाचारीने
पसरलेला हात मी
जिवंतांच्या जगातले
आहे एक शून्य मी
नशिबाच्या भोगातले
मूर्तिमंत दैन्य मी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा