१६३. चंद्र डाग
स्वप्न स्वप्नांचा हिंदोळा
उंच उंच गगनात
कसे इंद्रधनूचे रंग
आले माझीया हातात
रंग भरले माझे हात
आणि उंच माझा झोका
मावेना आनंद मनात
काय सांगू तुम्हा लोका
उंच उंच जाता जाता
आली जेव्हा मला जाग
हात टेकता आधाराला
चंद्रालाच पडला डाग
--- लबाड बोका
स्वप्न स्वप्नांचा हिंदोळा
उंच उंच गगनात
कसे इंद्रधनूचे रंग
आले माझीया हातात
रंग भरले माझे हात
आणि उंच माझा झोका
मावेना आनंद मनात
काय सांगू तुम्हा लोका
उंच उंच जाता जाता
आली जेव्हा मला जाग
हात टेकता आधाराला
चंद्रालाच पडला डाग
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा