१६४. प्रकाशित
लपवतो जसा चंद्र
आपली काळी बाजू
मी ही वागतो तसाच
लपवतो माझी लाजू
घालतो अंगावर मी
कपडे नीट नेटके
आतले कपडे मात्र
असतात बरेच फाटके
बोलतो लोकांशी मी
किती किती लडिवाळे
मनात मात्र माझ्या कधी
असतात विचार काळे
ठेवलं आहे लपवून अजून
गुपित हे सर्वांपासून
विश्वास ठेवा माझ्यावर
एकदम डोळे झाकून
सांगू नका कुणाला
माझं हे गुपित
मी सुद्धा रहातोच की
चंद्रासारखा प्रकाशित
--- लबाड बोका
लपवतो जसा चंद्र
आपली काळी बाजू
मी ही वागतो तसाच
लपवतो माझी लाजू
घालतो अंगावर मी
कपडे नीट नेटके
आतले कपडे मात्र
असतात बरेच फाटके
बोलतो लोकांशी मी
किती किती लडिवाळे
मनात मात्र माझ्या कधी
असतात विचार काळे
ठेवलं आहे लपवून अजून
गुपित हे सर्वांपासून
विश्वास ठेवा माझ्यावर
एकदम डोळे झाकून
सांगू नका कुणाला
माझं हे गुपित
मी सुद्धा रहातोच की
चंद्रासारखा प्रकाशित
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा