१६५. खास
कळ्या उमलताना जो
न आवाज होतो
तो मला अगदी
स्पष्ट ऐकू येतो
तुम्हाला जे दिसत नाही
ते दिसतं मला
आहेत माझ्या अंगी
अशा बऱ्याच कला
नजरेनेच करतो मी
कोणालाही स्पर्श
दुखितांच्या चेहऱ्यावर
आणतो मी हर्ष
घेतली आहे प्रत्यक्ष मी
नवरसांची चव
माझ्यासाठी नाही तसं
काहीसुद्धा असंभव
येतो मला कधी कधी
अमृताचा वास
आहे मी देवाचा
माणूस एकदम खास
--- लबाड बोका
कळ्या उमलताना जो
न आवाज होतो
तो मला अगदी
स्पष्ट ऐकू येतो
तुम्हाला जे दिसत नाही
ते दिसतं मला
आहेत माझ्या अंगी
अशा बऱ्याच कला
नजरेनेच करतो मी
कोणालाही स्पर्श
दुखितांच्या चेहऱ्यावर
आणतो मी हर्ष
घेतली आहे प्रत्यक्ष मी
नवरसांची चव
माझ्यासाठी नाही तसं
काहीसुद्धा असंभव
येतो मला कधी कधी
अमृताचा वास
आहे मी देवाचा
माणूस एकदम खास
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा