१६६. प्रश्न
मीच आणतो दगड
मीच घडवतो मूर्ती
मीच पूजतो त्याला
आणि घेतो स्फूर्ती
करतो लाचार स्तुती
गाऊन त्याची आरती
मीच पसरवतो त्याची
भली बुरी किर्ती
काय नेमकं केलंय मी
प्रश्न मला पडती
दगडाचा देव केला की
देवाची दगड माती
--- लबाड बोका
मीच आणतो दगड
मीच घडवतो मूर्ती
मीच पूजतो त्याला
आणि घेतो स्फूर्ती
करतो लाचार स्तुती
गाऊन त्याची आरती
मीच पसरवतो त्याची
भली बुरी किर्ती
काय नेमकं केलंय मी
प्रश्न मला पडती
दगडाचा देव केला की
देवाची दगड माती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा