१५५. हाव
लिहून लिहून किती लिहिणार
बुद्धी माझी आहे लहान
तरी बाळगतो स्वप्न उराशी
मी ही होईन कवी महान
आत्ता कुठे सुरुवात केलीय
लागेल अजून वेळ थोडा
घालतो समजूत माझी मीच
आवरून धरतो मनाचा घोडा
तरी सुद्धा झालोय अधीर
कधी होईल माझं नाव
कधी मिळेल मान मरातब
मला सुद्धा वाटते हाव
--- लबाड बोका
लिहून लिहून किती लिहिणार
बुद्धी माझी आहे लहान
तरी बाळगतो स्वप्न उराशी
मी ही होईन कवी महान
आत्ता कुठे सुरुवात केलीय
लागेल अजून वेळ थोडा
घालतो समजूत माझी मीच
आवरून धरतो मनाचा घोडा
तरी सुद्धा झालोय अधीर
कधी होईल माझं नाव
कधी मिळेल मान मरातब
मला सुद्धा वाटते हाव
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा