१५६. निरर्थक
जळी स्थळी काष्ठी पाषाणी
धुंडतो तुलाच दिशा दाही
असा कसा मला तुझा
थांगपत्ताच लागत नाही
प्रयत्न करतो भेटण्याचा
स्वप्नातही भेटत नाही
जगतो आहे तुझ्याशिवाय
पण हे काही जगणे नाही
सारं काही आहे माझ्याकडे
तेवढी फक्त तूच नाही
तुझ्याशिवाय ह्या साऱ्याला
खरंच काही अर्थ नाही
--- लबाड बोका
जळी स्थळी काष्ठी पाषाणी
धुंडतो तुलाच दिशा दाही
असा कसा मला तुझा
थांगपत्ताच लागत नाही
प्रयत्न करतो भेटण्याचा
स्वप्नातही भेटत नाही
जगतो आहे तुझ्याशिवाय
पण हे काही जगणे नाही
सारं काही आहे माझ्याकडे
तेवढी फक्त तूच नाही
तुझ्याशिवाय ह्या साऱ्याला
खरंच काही अर्थ नाही
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा