१६८. न्याय
देवाच्या मुखापासून म्हणे
उत्पन्न झाले ब्राह्मण
लुबाडतात मूर्ख लोकांना
करून देवालाच कारण
क्षत्रिय उत्पन्न झाले म्हणे
देवाच्या हातांपासून
वाचवता आला ना मर्दांना
देव धर्म परक्यांपासून
देवाच्या धडापासून म्हणे
उत्पन्न झाले वैश्य
व्यापाराच्या मिषाने लुबाडून
करतात साले ऐश्य
देवाच्या पायांपासून म्हणे
उत्पन्न झाले क्षूद्र
क्षूद्रांकडूनच घेतलाय इतरांनी
क्षूद्रांचा देव रूद्र
पहा न्याय नियतीचा
हसतात शहाणी लोकं
क्षूद्रांच्याच जन्मस्थळावर
टेकतात सगळे डोकं
--- लबाड बोका
देवाच्या मुखापासून म्हणे
उत्पन्न झाले ब्राह्मण
लुबाडतात मूर्ख लोकांना
करून देवालाच कारण
क्षत्रिय उत्पन्न झाले म्हणे
देवाच्या हातांपासून
वाचवता आला ना मर्दांना
देव धर्म परक्यांपासून
देवाच्या धडापासून म्हणे
उत्पन्न झाले वैश्य
व्यापाराच्या मिषाने लुबाडून
करतात साले ऐश्य
देवाच्या पायांपासून म्हणे
उत्पन्न झाले क्षूद्र
क्षूद्रांकडूनच घेतलाय इतरांनी
क्षूद्रांचा देव रूद्र
पहा न्याय नियतीचा
हसतात शहाणी लोकं
क्षूद्रांच्याच जन्मस्थळावर
टेकतात सगळे डोकं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा