१६९. दायित्व
आहेत असे कितीतरी अजून
काहीच नाही त्यांच्या पाशी
देवाधर्माच्या नावाने लुच्चे
गोळा करतात धनाच्या राशी
असंच चालू आहे सर्वत्र
दर दिवशी दर ताशी
मी विरोधात बोलतो तर
दूधात त्यांच्या पडते माशी
तूच कर्ता करविता देवा
तुझीच खोड मोडतो खाशी
ह्या साऱ्यांचा म्होरका तूच
तुलाच द्यायला हवी फाशी
--- लबाड बोका
आहेत असे कितीतरी अजून
काहीच नाही त्यांच्या पाशी
देवाधर्माच्या नावाने लुच्चे
गोळा करतात धनाच्या राशी
असंच चालू आहे सर्वत्र
दर दिवशी दर ताशी
मी विरोधात बोलतो तर
दूधात त्यांच्या पडते माशी
तूच कर्ता करविता देवा
तुझीच खोड मोडतो खाशी
ह्या साऱ्यांचा म्होरका तूच
तुलाच द्यायला हवी फाशी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा