१७०. द्वैत
सूर्याचं पडतं ऊन
चंद्राचं पडतं चांदणं
माहित नाही दोघांनाही
एकत्र कसं ते नांदणं
भरती आणि ओहोटी
येतात वेळच्या वेळी
पण येऊ शकत नाही कधीच
दोन्ही एकाच वेळी
येऊ शकत नाही कधी
जन्माशिवाय मरण
अहं जेव्हा गळून पडतो
तेव्हाच जाता येतं शरण
--- लबाड बोका
सूर्याचं पडतं ऊन
चंद्राचं पडतं चांदणं
माहित नाही दोघांनाही
एकत्र कसं ते नांदणं
भरती आणि ओहोटी
येतात वेळच्या वेळी
पण येऊ शकत नाही कधीच
दोन्ही एकाच वेळी
येऊ शकत नाही कधी
जन्माशिवाय मरण
अहं जेव्हा गळून पडतो
तेव्हाच जाता येतं शरण
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा